महिला व बालकल्याण विभाग बाबत थोडक्यात
महिला व बालकल्याण विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो याचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण)असे असते. जिल्हा परिषदेेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) असतो.पंचायत समिती स्तरावरील एकुण 9 प्रकल्पाच्या नियंत्रणासाठी वर्ग 2 चा अधिकारी काम पाहतो यास बाल विकास प्रकल्प अधिकारी असे पदनाम आहे. जिल्हयात एकुण मंजूर आंगणवाडी 1570 असून मिनी अंगणवाडी 243 आहेत.या विभागाचा उदेश ग्रामिण भागात कुपोषण निर्मुलन करणे,अनौपचारीक शिक्षण देणे,किशोरी वयीन मुलींना लग्लानंतर गरोदर पणाचे वेळी ध्यावयाची काळजी बाबत पशिक्षण देणे,गरोदर मातांना आहाराविषयी व आरोग्य विषयी प्रशिक्षणाव्दारे मार्गदर्शन करण्यात येते. तसेच या विभागामार्फत केंद्र,राज्य शासन व जिल्हा परिषद चा जिल्हानिधि यामधून विविध योजना राबविल्या जातात.यात खालीलप्रमाणे योजनांचा समावेश आहे.या योजना दरीद्रय रेषेखालील कुटूंबासाठी आहेत. 1. शाळेकरू मुलींना 100 टक्के अनुदानावर दोन चाकी सायकल पुरविणे, 2. विघवा महिलांच्या विवाहासाठी अनुदान योजना. 3. ग्रामिण भागातील महिला/मुलींना सौरकंदील पुरविने 90 टक्के अनुदानावर 4. ग्रामिण भागातील महिला/मुलींना सौदर्यप्रसाधन प्रशिक्षण देणे 90 टक्के अनुदानावर 5. एम.एस.सी.आय.टी. 12 वी पास अनुसुचित जाती करीता. 6. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना.