ग्रामिण पाणी पुरवठा विभाग

ग्रामिण पाणी पुरवठा विभाग बाबत थोडक्‍यात

ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्‍हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम कार्यकारी अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा)असते. यासोबत एक वर्ग 2 चे अधिकारी उपकार्यकारी अभियंता म्‍हणून काम पाहतात. तसेच विंधन विहीरी साठी तांत्रीक विभाग कार्यरत आहे. यात प्रमुख म्‍हणून उपअभियंता यांत्रीकी काम पाहतो. पंचायत समिती स्‍तरावर नियंत्रंण करण्‍यासाठी वर्ग -2 चे उपविभागीय उपअभियंता म्‍हणून जिल्‍हयात 3 उपविभागात कार्यरत आहेत.

जिल्‍हयात एकुण 04 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असून हातपंप 9675, पावरपंप 151,सोलरपंप 483 तसेच साध्या विहीरी 4486 आहेत. जिल्‍हयात ग्रामिण भागात सर्वसामान्‍य जनतेला तसेच शाळेतील विद्यार्थ्‍यांना व आंगणवाडीतील मुला-मुलींना स्‍वच्‍छ पाण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी जवाबदारी देण्‍यात आली आहे.यासाठी केंद्र व राज्‍य तसेच जिल्‍हानिधि मधून विविध योजना राबवून हा विभाग आपले कर्तव्‍य पुर्ण करण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍नशिल राहतो.

यासाठी केंद्र शासनाचे जल जिवन मिशन व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.