वित्त विभाग बाबत थोडक्यात
वित्त विभाग जिल्हा परिषद या विभागचा प्रमुख हा राज्य शासनाच वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम मुख्य लेखा व वित्त अधिकारी असते.हाच अधिकारी जिल्हा परिषदेच्या वित्त समीतीचा सचिव असतो. यासोबत एक वर्ग 1 चे अधिकारी राहतो.पंचायत सिमती स्तरावर सहायक लेखा अधिकारी हा वर्ग 3 चा अधिकारी असतो.
या विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रक तयार करणे,लेखे लिहीने,विविध निधिचे ताळमेळ करणे,सर्व प्रकारच्या निधिचे वाटप व नियंत्रण ठेवणे व विहीत मुदतीत संपुर्ण निधि खर्च करणे,लेखा आक्षेप निपटारा करणे इत्यादी बाबी या विभागातून हाताळल्या जातात.
याशिवाय जिल्हा परीषे्देच्या निधि चे अंदाजपत्रक तयार करणे व त्यानुसार वर्षअखेर खर्च्याचे ताळमेळ करणे व लेखे तयार करणे ही कामे करण्यात येतात.