माध्‍यमिक शिक्षण विभाग

माध्‍यमिक शिक्षण विभाग बाबत थोडक्‍यात

शिक्षण विभागाचा प्रमुख राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो याचे पदनाम शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) असे असते. तसेच याच विभागात दोन वर्ग 2 चे अधिकारी उपशिक्षणाधिकारी म्‍हणून काम पाहतात.

जिल्‍हयात एकुण अनुदानीत खाजगी माध्‍यमिक शाळा 217 तर विना अनुदानीत खाजगी माध्‍यमिक शाळा 27 तसेच कायम विना अनुदानीत खाजगी माध्‍यमिक शाळा 10 या विभागाचा उदेश ग्रामिण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावने व गुणवत्‍ता मध्‍ये वाढ करणे यासाठी केंद्र व राज्‍य शासनामार्फत राबविल्‍या जाणा-या योजना उत्‍साहाने राबविल्‍या जातात.

या विभागामार्फत खाजगी शाळेची संच मान्‍यता देणे, मान्‍यता वर्धीत करणे, रोष्‍टरची पाहणी करणे, शाळा तपासणे, शाळेत शिक्षकांची पदभरती करण्‍याची मंजूरी प्रदान करणे,शिक्षकांचे मान्‍यता प्रदान करणे,अनुदान वाटप करणे व विद्यार्थ्‍यांना स्‍कॉलरशिप वाटप करणे इत्‍यादी प्रकारची कामे कामे हाताळली जातात.