कृषी विभाग

कृषी विभाग बाबत थोडक्‍यात

कृषी विभागाचा प्रमख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 दर्जा असलेला अधिकारी असतो. यास कृषी विकास अधिकारी असे पदनाम आहे.या विभाग मार्फत पिकाचे उत्‍पन्‍न व गुणवत्‍ता वाढविण्‍यासाठी अनेक राज्‍य व केंद्र शासना योजना प्रभाविपणे राबविल्‍या जातात.तसेच अपांपरीक उर्जा स्‍त्रोत बळकटीकरण करणे.

गोंदिया जिल्‍हयाचे भौगोलिक क्षेत्र 564100 हेक्‍टर असून लागवडी खाली क्षेत्र 256400 हेक्‍टर आहे. असून लागवडी योग्य क्षेत्र २५६४०० हेक्टर आहे गोंदिया जिल्‍हयात सिंचन प्रकल्पामध्ये मोठे - 2, मध्यम - १०, लघु व इतर प्रकल्प १९९ असे एकून २११ सिंचन प्रकल्प असून, खरीप २०२२-२३ मध्ये उसाखाली ६९५.९० हेक्टर, गळीत धन्य ८८८.१४ हेक्टर व तरून धन्य पिका खालील १९४३७४.८२ हेक्टर व इतर पिके ६९८५.५३ एकूण २०२९४४.४२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड झाली. या प्रमाणे खरीप पिक लागवडीची सर्व साधारण क्षेत्राची टक्केवारी १०४.६१ टक्के आहे.
एकूण भौगोलीक क्षेत्र ५६४१०० हे.
एकूण वन क्षेत्र २५६४०० हे.
एकूण लागवडीलायक क्षेत्र २२०२४६ हे.
एकूण सिंचनाखाली क्षेत्र १११५१२ हे.
खरीप हंगामा क्षेत्र १९४३५१.५० हे.
रब्बी हंगामा क्षेत्र २३६५१.३० हे.
एकूण शेतकरी संख्या २७२१७८
एकूण सर्वे नंबरची संख्या ४६२६३२