बंद

    परिचय

    महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटच्या टोकाच्या पुर्व दिशेला बसलेला 1 मे 1999 रोजी पासून नवनिर्मीत झालेला गोंदिया जिल्हा हा बहुतांशी आदीवासी क्षेत्र असलेला जिल्हा आहे. या जिल्हयात एकुण 8 पचांयत समिती व 9 एकात्मीक बाल विकास प्रकल्प व 545 ग्राम पंचायती कार्यरत आहेत. तसेच जिल्‍हयात 40 प्राथमिक आरोग्‍य केंद्र , 258 उपकेंद्र, 10 ग्रामिण रूग्‍णालय, 1017 जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, 21 माध्यमिक शाळा, 17 उच्‍च उच्च माध्यमिक शाळा, 1568 कार्यरत आंगणवाडी व 237 मिनी अंगणवाडी आहेत. 4 पशुवैधकीय श्रेणी -1 दवाखाने, 34 पशुवैधकीय श्रेणी -2 दवाखाने, 1421 माजी मालगुजारी तलाव तसेच सिंचनासाठी 2- मोठे प्रकल्प , 09- मध्‍यम प्रकल्प, 20- लहान प्रकल्प आहेत. या प्रकारच्‍या सोई सुविधाच्या आधारावर जिल्हयातील ग्रामिण भागातील जनतेची देखभाल व दरडोई उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवून विकास करण्‍यात येतो. जिल्हा परिषद हे ग्रामिण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. या जिल्हयात लहानात लहान गावात विकासाचा बिज लावण्‍यात आला असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहीती ग्रामिण भागात विविध प्रसार माध्यमाव्दारे प्रवाहित करण्‍यात येते व प्रखरपणे योजनांची अंमलबजावणी करण्यात येते ज्यामुळे जिल्हयाचा विकास करण्‍यात येतो.