समाज कल्याण विभाग
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम समाज कल्याण अधिकारी असते.हाच अधिकारी जिल्हात परिषदेच्या समाज कल्याण समितीचा सचिव असतो.हा विभाग मागास वर्गीयांचे विकासासठी सदैव प्रयत्नशिल राहतो.यासाठी केद्र व राज्यच शासनाच्याो विविध योजना अतिशय उत्कृष्ठ प्रकारे प्रसार, प्रशिध्दी करून राबविल्यात जातात. जिल्हयात ग्रामिण भागात एकुण 44 वस्ती गृह आहेत. ग्रामिण भातील मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी स्कॉलरशिप, जिल्हानिधि मधून सायकल व शिलाई मशीन पुरविने,तसेच मागासवर्गीय लोकांच्याय वस्ती मध्येज रस्ते,पथ दिवे, समाज भवन,नाली बांधकाम करणे,इत्यािदी प्रकारचे काम अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजना अंतर्गत करण्यात येतात.
योजना
- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध क्षेत्रांसाठी विकास योजना.
- अपंग आणि अपंग विवाह योजना.
- आंतरजातीय विवाह योजना.
- विद्युत मोटर योजना.
- एचडीपीई-पीव्हीसी पाईप योजना.
- कापड शिलाई मशीन योजना.
- लेदर शिलाई मशीन योजना.
- अपंग कल्याण योजना.
- दुचाकी सायकल योजना.
- मासेमारी नायलॉन जाळी योजना.
- लाउडस्पीकर सेट आणि चांदी योजना.
- ग्रंथालयांसाठी पुस्तक संग्रह योजना.
- ग्रंथालयासाठी बुकशेल्फ योजना.
श्री.दिलीप खोटोले.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी(प्रभारी),
समाज कल्याण विभाग,
फोन:- 07182-233291,
ई-मेल:- swozpgondia[at]rediffmail[dot]com