पशुसंवर्धन विभाग
पशुसंवर्धन विभागाचा प्रमख हा राज्य शासनाचा वर्ग 1 दर्जा असलेला अधिकारी असतो.यास जिल्हा पशुसंर्धन अधिकारी असे पदनाम आहे.या विभागामार्फत पशुंपालन तसेच दुध उत्पादन वाढविण्याससाठी अनेक राज्य व केंद्र शासना योजना प्रभाविपणे राबविल्या जातात.जिल्हायात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 – 27 व श्रेणी 2 – 37 असे एकुण 64 दवाखाने कार्यरत आहेत. यामध्ये एक डॉक्टनरची नेमणूक राज्य शासनामार्फत केलेली असते या पशुधन विकास अधिकारी असे पदनाम दिलेले आहे. तसेच पंचायत समिती स्तनरावरील कार्यालयात प्रमुख म्हणून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यरत असतो.
या विभागामार्फत पशुपालनासाठी कृत्रीम रेतन केंद्रामध्ये वंशावळीत सुधारणा करून उत्पादन क्षमतेत वाढ करण्याात येते,संसर्गजन्ये रोगाचा निर्मुलनासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करणे, पशुरोग निदान व उपचार तसेच शासनाच्याल विविध योजनांतर्गत जनावरांचे वाटप करणे व योजनांचा पाठपुरावा करणे.कृतिशिबीरे व प्रशिक्षणाच्यास माध्ययमातुन शेतक-यांना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे या विभागामार्फत करण्यात येतात.
गुरांच्याा जनगणनेनुसार या जिल्हजयात एकुण गुरांची संख्यार 736531 असून त्यापैकी संकरीत जनावरे 12899, म्हनशी 101634 मेंढया व शेळया 159330 अशी जनावरे आहे. या पैकी 11151 गुरांचा खच्ची करण्या त आले आहे.तसेच 307890 कुकुटदायी पक्षी आहेत.प्रमाणकानुसार 250 मि.ली.प्रति व्यचक्तीण दुधाची गरज आहे परंतू आपल्या जिल्हयात 119.7 मि.ली.प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता आहे. यात वाढ करण्याेसाठी ही यंत्रणा सतत प्रयत्नशिल आहे.
डॉ.कांतीलाल पटले
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
पशुसंवर्धन विभाग,
फोन:-07182-234131,
ई-मेल:-dahozp[dot]gondia1[at]gmail[dot]com