कृषी विभाग
कृषी विभागाचा प्रमख हा राज्य शासनाचा वर्ग 1 दर्जा असलेला अधिकारी असतो. यास कृषी विकास अधिकारी असे पदनाम आहे.या विभाग मार्फत पिकाचे उत्पन्न व गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक राज्य व केंद्र शासना योजना प्रभाविपणे राबविल्या जातात.तसेच अपांपरीक उर्जा स्त्रोत बळकटीकरण करणे. गोंदिया जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 564100 हेक्टर असून लागवडी खाली क्षेत्र 256400 हेक्टर असून लागवडी योग्य क्षेत्र २५६४०० हेक्टर आहे. गोंदिया जिल्हयात सिंचन प्रकल्पामध्ये मोठे – 2, मध्यम -१०, लघु व इतर प्रकल्प १९९ असे एकून २११ सिंचन प्रकल्प असून, खरीप २०२२-२३ मध्ये उसाखाली ६९५.९० हेक्टर, गळीत धन्य ८८८.१४ हेक्टर व तरून धन्य पिका खालील १९४३७४.८२ हेक्टर व इतर पिके ६९८५.५३ एकूण २०२९४४.४२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड झाली. या प्रमाणे खरीप पिक लागवडीची सर्व साधारण क्षेत्राची टक्केवारी १०४.६१ टक्के आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वसाधारण जून ते ऑक्टोंबर या काळात पाउस पळत असतो . तसेच जिल्ह्यात १३२६.५४ मी.मी सरासरी पर्जन्यमान असून या वर्षात १७६८.८ मी.मी सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात या वर्षात १३३.३४ टक्के पूस झालेली आहे. रब्बी सन २०२१-२२ मध्ये एकूण तृणधान्य पिके(गहूं) – ३१८६.३० हेक्टर, एकूण कळधान्य पिके ( हरभरा व इतर कळधान्य ) – १४१२९.९१ हेक्टर, एकूण गळीत धान्य पिके ( जवस व इतर गळीत धन्य ) – ३६३५.९४ हेक्टर,तसेच भाजीपाला व इतर पिके – २६३१.४५ हेक्टर, क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
सन २०२२-२३ मध्ये उन्हाळी भाताचे सर्व साधारण क्षेत्र – ५१३७८.२० हे. असून, या हंगामात प्रामुख्याने उन्हाळी भाताचे लागवड – ३४६३२.५९ हे. क्षेत्रावर करण्यात आली आहे.उन्हाळी भात बियाणेची एकूण 32746 मांगणी करण्यात आलेली होती .खाजगी कंपन्यांकडून 166870 क्विंटल असे एकूण 2404 क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आले.
श्री.अतुल येडे
कृषी विकास अधिकारी (प्रभारी),
कृषी विभाग ,
फोन :-07182-232437,
ई-मेल :-ado_zpgondia[at]rediffmail[dot]com