आरोग्य विभाग
आरोग्य विभाग जिल्हा परिषद या विभागचा प्रमुख हा राज्य शासनाच वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम जिल्हा आरोग्य अधिकारी असते.हाच अधिकारी जिल्हा परिषदेच्यात आरोग्य समीतीचा सचिव असतो. यासोबत दोन वर्ग 1 चे अधिकारी राहतात एक अतिरिक्ता जिल्हा आरोग्य अधिकारी व दुसरा सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, पचांयत समिती स्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी हा वर्ग 2 चा अधिकारी असतो. आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्ग 2 चे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
जिल्हयात एकुण 40 प्राथमिक आरोग्य केंद्र व 258 उपकेंद्र कार्यरत आहेत. तसेच एक जिल्हा रुग्णालय, एक स्त्रीी रुग्णालय,10 ग्रामिण रुग्णालय, 4 मोबाईल मेडीकल युनिट इत्यादी कार्यालये आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहेत. यामध्येय वैद्यकीय अधिकारी व इतर तांत्रीक मनुष्य बळ कार्यरत असून जिल्हयात उत्तम आरोग्य सवा देण्याचे काम करीत आहे.
जिल्हयात आरोग्या विषयी शासनाचे एक मिशन कार्य करीत आहे ते म्ह्णजे राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य मिशन अतंर्गत व नियमीत आरोग्या विभागामार्फत शासनाच्याे विविध योजना राबवून ग्रामिण जनतेच्या आरोग्य चांगले ठेवण्याीत प्रयत्नयशिल राहते व जिल्हयाचा विकास कसा जलद गतीने होईल यांचे नेहमी नियोजन करण्यात येते.
नागरिकांचा कॉर्नर
कार्यक्रम
- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम
- सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय कर्करोग मधुमेह व पक्षाघातप्रतिबंधक कार्यक्रम
- साथरोग नियंत्रण कार्यक्रम
- कॉलरा नियंत्रण कार्यक्रम
- एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प
- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
डॉ.नितीन वानखेडे
जिल्हा आरोग्य अधिकारी ,
जिल्हा आरोग्य विभाग ,
फोन :-07182-231136,
ई-मेल:- dhozp_gondia[at]rediffmail[dot]com