गोंदिया जिल्‍‍हयातील पर्यटन स्‍थळे

गोंदिया जिल्‍‍हयातील पर्यटन स्‍थळ बाबत थोडक्‍यात

गोंदिया जिल्‍हयात मोजकी परंतू अतिशय सुंदर पर्यटन स्‍थळे आहेत. हा जिल्‍हा तलावांचा जिल्‍हा म्‍हणून प्रशिध्‍द आहे. पर्यटनासाठी या तलावांचा या जिल्‍हयात उपयोग करण्‍यात आला आहे.यासाठी विविध योजनांच्‍या माध्‍यमातून निधि प्राप्‍त करून पर्यटन स्‍थळांचा विकास करण्‍याचा प्रयत्‍न या जिल्‍हयात करण्‍यात आला आहे. या जिल्‍हयात पर्यटनासाठी ‍चांगला वाव आहे कारण या जिल्‍हयास प्रध्‍यप्रदेश व छत्‍तीसगड या दोन राज्‍याची सिमा लागुन आहे. या जिल्‍हयात खालील प्रमाणे पर्यटन स्‍थळे आहेत.

सुर्यादेव मांडोबाई - हे स्‍थळ गोरेगाव तालुक्‍यात आहे. गोंदिया पासून 37 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी भगवान सुर्यादेव,देवी मांडोबाई,शिव, चे टेकडीवर मंदीर आहेत. हे स्‍थळ उंच वहेशिर आहे. याठीकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व मकरसंक्रातीला यात्रा भरते.यावेळी जवळपास 15000ते 20000 पर्यंत भावीक याठीकाणी येवून पुजा अर्चना करतात.यावेळी प्रशानामार्फत तशी व्‍यवस्‍था केली जाते.

महादेव पहाडी -महादेव पहाडी हे स्‍थळ आमगाव तालुक्‍यात आहे.आमगाव पासून 3 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी भगवान शिव, दुर्गा माता, भैरव व गणेश यांचे मंदीर आहेत.हे सथळ उंच वहेशिर आहे. याठीकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व अश्‍विन नवरात्रीला यात्रा भरते.यावेळी जवळपास 15000ते 20000 पर्यंत भावीक याठीकाणी येवून पुजा अर्चना करतात.यावेळी प्रशानामार्फत तशी व्‍यवस्‍था केली जाते.

नवेगांव बांध - गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. यासाठी जवळचे रेल्‍वे स्‍टेशन देवूलगांव असून हे गोंदिय-चंद्रपुर या मार्गावर आहे.हे नागपुर पासून 150 की.मी.अंतरावर आहे.येथे धरण असून बोटींगसाठी प्रशिध्‍द आहे.येथे जवळपास जंगलाचे प्रकार 5ए/सी3 असून याठीकाणी राष्‍टीय उदयाण आहे यात 209 प्रकारचे पक्षी, 9 प्रकारचे सरपटणारे जाती, 26 पकारचे मांशाहारी जातीचे प्राणी राहतात.यात मुख्‍यत: वाघ,चिता,जंगली मांजर,हरीण, कोल्‍हा, लांडगा इत्‍यादी.येथे राहण्‍यासाठी विश्राघर तसेच लॉज, हॉटेल्‍स इत्‍यादी आणि येथेच प्राणि संग्रहालय व वाचनालय आहे.

प्रतापगड - गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून 75 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. हे नागपुर पासून 175 की.मी.अंतरावर आहे.येथे टेकडी असून महादेवाचे प्रशिध्‍द मंदीर आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते.या यात्रेला जवळपास 30000 यात्री दर्शनासाठी येथे येतात. येथे स्‍थळ अतिशय रमनिय व नैसिर्गक देखवा आहे.

बोंडगाव-देवी- गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून 15 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. हे नागपुर पासून 155 की.मी.अंतरावर आहे.येथे गंगा-जमूना देवीचे प्रशिध्‍द मंदीर आहे.येथील यात्रेच्‍या वेळी 5000 ते 6000 भावीक दरवर्षी येतात.ही यात्रा चैत्र महीण्‍यात भरते.

परसटोला- गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून 85 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. येथे महादेव चे प्रशिध्‍द मंदीर आहे.येथील यात्रेच्‍या वेळी 5000 ते 6000 भावीक दरवर्षी येतात.ही यात्रा महाशिवरात्रीला भरते.

इटीयाडोह धरण- गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून 90 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. येथील भव्‍य जलाशय प्रशिध्‍द मंदीर आहे.येथील निर्सगाचे रम्‍य स्‍थळ पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 लोक दरवर्षी येतात.

शशिकरण पहाडी- गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस सडक-अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून 30 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. येथील भव्‍य जलाशय प्रशिध्‍द मंदीर आहे. येथे शशीकरण देवाचे मंदीर आहे. येथे नवरात्र व दसरा या दिवशी यात्रा भरते यावेळी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 लोक दरवर्षी येतात.

घुकेश्‍वरी माता मंदीर - गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस देवरी तालुक्‍यात गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथील मंदीराचे मागील भागात अभयारण्‍य आहे. व आदीवासी लोकांची वस्‍ती आहे.या ठीकाणी चैत्रा नवरात्र चा सन यात्रेच्‍या उत्‍साहात साजरा केला जातो. यावेळी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 20000 ते 25000 लोक दरवर्षी येतात.

सिरपुर धरण- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस देवरी तालुक्‍यात गोंदिया पासून 75 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. या धरणाच्‍या चारही बाजूनी जंगल व टेकडया आहे. याठीकाणी दर दिवशी किमान 100 यात्रेकरू येतात.

पुजारीटोला धरण- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस आमगाव तालुक्‍यात गोंदिया पासून 50 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. या धरणाच्‍या चारही बाजूनी जंगल व टेकडया आहे. याठीकाणी दर दिवशी किमान 100 ते 200 यात्रेकरू येतात. तसेच शैक्षणीक सहलसाठी अनेक शाळेतून विद्यार्थी येतात.

चित्रकुट पलार टेकडी- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस देवरी तालुक्‍यात गोंदिया पासून 90 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. हे स्‍थान देवरी - चिचगड -ककोडी या बस मार्गावर आहे.येथे श्रीराम हनुमान व गडमाता यांचे मंदीर आहेत. हे मंदीर जवळजवळ 150 ते 200 वर्षापुर्विचे आहेत.हे सथळ चारही बाजूनी जंगल घेरलेले आहे तसेच याठीकाणी उक तलाव सुध्‍दा आहे; याठीकाणी महाशिवरात्रीला, रामनवमी तसेच कार्तिक पौर्निमेला व हनुमान जंयती च्‍या दिवशी विविध कार्यक्रम घेतले जातात. व चैत्र नवरात्रीला मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्‍यात येते.

शिवमंदीर कामठा- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस गोंदिया तालुक्‍यात गोंदिया पासून 25 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. हे स्‍थान गोंदिया - कामठा -आमगांव या बस मार्गावर आहे.येथे भव्‍य शिवलींग आहेत. याठीकाणी महाशिवरात्रीला, मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्‍यात येते.यावेळी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 लोक दरवर्षी येतात.

कोरणी-रजेगाव-गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस गोंदिया तालुक्‍यात गोंदिया पासून 25 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. हे स्‍थान गोंदिया - रजेगाव -बालाघाट या बस मार्गावर आहे. येथे भगवान विठठल- रूखमाई व हनुमान यांचे सुदंर मंदीर आहे. याठीकाणी आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला, मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्‍यात येते.यावेळी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भावीक दरवर्षी येतात.

शिवमंदीर नागरा- गोंदिया जिल्‍हयाच्‍या उत्‍तरेस गोंदिया तालुक्‍यात गोंदिया पासून 7 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस व आटोरिक्‍सा चे साधन आहे. हे स्‍थान गोंदिया - रजेगाव -बालाघाट या बस मार्गावर आहे. येथे भगवान शिव ,भैरव व हनुमान यांचे सुदंर मंदीर आहे. याठीकाणी नवरात्री व महाशिवरात्रीला, मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्‍यात येते.यावेळी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भावीक दरवर्षी येतात.

ताजूदीनबाबा-मजार-दांडेगाव-गोंदिया जिल्‍हयाच्‍या पश्‍चिमेस गोंदिया तालुक्‍यात गोंदिया पासून 20 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. हे स्‍थान गोंदिया - एकोडी - तिरोडा या बस मार्गावर आहे. येथे ताजूदीन बाबा चे व भगवान हनुमान चे मंदीर आहे. याठीकाणी उर्सच्‍या वेळी मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्‍यात येते.यावेळी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भावीक दरवर्षी येतात.

नागझिरा - गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्‍यात गोंदिया पासून 30 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. हे स्‍थान गोंदिया - कोहमारा या बस मार्गावर आहे. या अभारण्‍याचा परीसर एकुण 152.81 स्‍के.कि.मी. आहे. या ठीकाणी 166 प्रकारच्‍या पक्ष्‍यांच्‍या जाती, 36 सरपटणा-या प्रण्‍यांच्‍या जात व 34 प्रकारच्‍या जंगली प्राण्‍याच्‍या प्रजाती आहेत. या ठीकाणी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 25000 ते 30000 पर्यटक दरवर्षी येतात.

चुलबंध - गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्‍यात गोंदिया पासून 28 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. हे स्‍थान गोंदिया - कोहमारा या बस मार्गावर आहे. या ठीकाणी लघूपाटबंधारे विभागाचे मोठे जलाशय आहे. हा भाग वन विभागाचा आहे.या ठीकाणी पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

पोंगेझरा -बोळूंदा - गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिनेस गोरेगाव तालुक्‍यात गोंदिया पासून 32 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे भगवान शिवचे मंदीर आहे.या ठीकाणी महाशिवरात्रीची यात्रा पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

पोंगेझरा -हिरडामाली- गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिनेस गोरेगाव तालुक्‍यात गोंदिया पासून 15 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे भगवान शिवचे मंदीर आहे.या ठीकाणी महाशिवरात्रीची यात्रा पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

गडमाता- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस सालेकसा तालुक्‍यात गोंदिया पासून 40की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे टेकडीवर देवी गडमाता चे मंदीर आहे.या ठीकाणी महाशिवरात्री व चैत्रची यात्रा पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

हाजरॉफाल- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस सालेकसा तालुक्‍यात गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे टेकडीवरील पाणी खाली पडल्‍यामुळे धबधबा चे निसर्गरम्‍य व मनमोहक दृष्‍य आहे. या ठीकाणी धबधबा पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

कचारगड- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस सालेकसा तालुक्‍यात गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे आदीवासी गोंड समाजाचे कुल दैवत असून चैत्र नवरात्रीला त्‍यांचा पांरपारीक सन मोठया उत्‍साहात साजरा केला जातो हे मनमोहक दृष्‍य राहते. या ठीकाणी दोन मोठया गुहा आहेत.या ठीकाणी कार्यक्रम पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

कालीसरार धरण- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पुर्वेस सालेकसा तालुक्‍यात गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे येथील धरण हे मोठया टेकडयांनी बांधलेले आहे.त्‍यामुळे धरणाचे मनमोहक दृष्‍य दिसते. या ठीकाणी घनदाट जंगल पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 30000 ते 35000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

डाकराम-सुकडी- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पश्‍चिमेस तिरोडा तालुक्‍यात गोंदिया पासून 47 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे चक्रधरस्‍वामीचे पुरातन काळातील मंदीर व महानुभव पंथाचे संत याची समाधी आहे. येथील चैत्र पौर्निमेची यात्रा पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 30000 ते 35000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

बोदलकसा- गोंदिया जिल्‍हयाच्‍या पश्‍चिमेस तिरोडा तालुक्‍यात गोंदिया पासून 50 की.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस चे साधन आहे. येथे अतिशय रमनिय असा तलाव आहे हा तलाव जंगलात आहे. येथे पाटबंधारे विभागाचे विश्राम भवन आहे. येथे महाशिवरात्रीची यात्रा पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.