जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा

जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा बाबत थोडक्‍यात

जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा गोंदिया या कार्यालयाकडून नियमीतपणे केंद्र शासनाच्‍या स्‍वर्ण जंयती ग्राम स्‍वयंरोजगार योजना,इंदिरा आवास योजना,राजीव गांधी ग्रामिण निवारा योजना, राष्‍ट्रीय सम विकास योजना,एकात्‍मीक पडीक जमीन विकास कार्यक्रम, मागास क्षेत्रासाठी विकास निधि, महात्‍मा फुले जलसंधारण अभियान इत्‍यादी योजना राबविल्‍या जातात.

वरील योजनांपैकी स्‍वर्ण जंयती ग्राम स्‍वयंरोजगार योजना, इंदिरा आवास योजना,राजीव गांधी ग्रामिण निवारा योजना या योजनामध्‍ये वैयक्‍तीक लाभाच्‍या भाग आहे त्‍यामुळे दारीद्रय रेषेखालील व इतर ग्रामिण क्षेत्रातील लोकांना लाभ देण्‍यात येतो.

वरील योजनांचा मासीक प्रगती अहवाल राज्‍य शासनास व केंद्र शासनास इंटरनेटव्‍दारे शासनाच्‍या www.rural.nic.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) व एकात्‍मीक पडीक जमीन विकास कार्यक्रम चा 5 वर्षाचा आराखडा तसेच मासीक अहवाल www.watershed.nic.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) नियमीत सादर करण्‍यात येतात.तसेच दारीद्रय रेषेखालील कुंटूबाचे सर्वेक्षणाचा पंधरवाडी अहवाल nilam.sawheny@nic.in या e-mail वर नियमीत सादर करण्‍यात येते.