पशुसंवर्धन विभाग

ज्येष्ठता यादी

  • पशुसर्वधन सर्वार्गाच्या सावित्रिक बदल्या २०२१ ची तात्पुरती प्रशासकीय विनंती बदलीची सेवा जेष्टता यादी
  • सहायक पशुधन विकास अधिकारी या पदाची विभागीय स्तरावरील तात्पुरती सेवाजेष्टता यादी दि.०१.०१.१९ व ०१.०१.२०
  • सेवा जेष्‍ठता यादी २०२०
  • पशुसंवर्धन विभाग विषयी थोडक्‍यात

    पशुसंवर्धन विभागाचा प्रमख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 दर्जा असलेला अधिकारी असतो.यास जिल्‍हा पशुसंर्धन अधिकारी असे पदनाम आहे.या विभागामार्फत पशुंपालन तसेच दुध उत्‍पादन वाढविण्‍यासाठी अनेक राज्‍य व केंद्र शासना योजना प्रभाविपणे राबविल्‍या जातात.जिल्‍हयात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 - 27 व श्रेणी 2 - 37 असे एकुण 64 दवाखाने कार्यरत आहेत. यामध्‍ये एक डॉक्‍टरची नेमणूक राज्‍य शासनामार्फत केलेली असते या पशुधन विकास अधिकारी असे पदनाम दिलेले आहे. तसेच पंचायत समिती स्‍तरावरील कार्यालयात प्रमुख म्‍हणून पशुधन विकास अधिकार (विस्‍तार) कार्यरत असतो.

    या विभागामार्फत पशुपालनासाठी कृत्रीम रेतन केंद्रामध्‍ये वंशावळीत सुधारणा करून उत्‍पादन क्षमतेत वाढ करण्‍यात येते,संसर्गजन्‍य रोगाचा निर्मुलनासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करणे, पशुरोग निदान व उपचार तसेच शासनाच्‍या विविध योजनांतर्गत जनावरांचे वाटप करणे व योजनांचा पाठपुरावा करणे.कृतिशिबीरे व प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना मार्गदर्शन करणे इत्‍यादी कामे या विभागामार्फत करण्‍यात येतात.

    गुरांच्‍या जनगणनेनुसार या जिल्‍हयात एकुण गुरांची संख्‍या 736531 असून त्‍यापैकी संकरीत जनावरे 12899, म्‍हशी 101634 मेंढया व शेळया 159330 अशी जनावरे आहे. या पैकी 11151 गुरांचा खच्‍ची करण्‍यात आले आहे.तसेच 307890 कुकुटदायी पक्षी आहेत.प्रमाणकानुसार 250 मि.ली.प्रति व्‍यक्‍ती दुधाची गरज आहे परंतू आपल्‍या जिल्‍हयात 119.7 मि.ली.प्रति व्‍यक्‍ती दुधाची उपलब्‍धता आहे. यात वाढ करण्‍यासाठी ही यंत्रणा सतत प्रयत्‍नशिल आहे.